Posted in मराठी कविता

इच्छा

” इच्छा ”

सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून,

आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून…😔
आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे,

मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे…😔
माफी मागतो आई तुझी मी हाथ माझे जोडूनी,

ऐकलं नाही काही तुझं मी गेलो तुला सोडूनी…😔
भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन

म्हणला दादा येताना जीन्स ये घेऊन…😔
बहीण माझी छोटी करायचं होतं लगीन,

बोलली रक्षाबंधना ला वाट तुझी बघीन…😔
बायको सर्व बघत होती डोळे आले भरून

निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून…😭
काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट,

बेल वाजली एस.टि. ची निघाली मुंबई ची वाट…😌
काय झालं काय जुनू, मन नव्हतं लागत,

पुसले माझे डोळे मी खिडकी बाहेर बघत…😭
तेवढ्यात भेटला दणका हाहाकार झाला,

बस झाली पलटी पाणी आत

आला…😔
काय करू कुठे जाऊ? क्षणात संपलं सारं,

जीव घुटमटला डोळे फिरले पाणीच पाणी सारं…😔
बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच,

बंद पडले शरीर माझे चालले तेवढे हातच…😌
जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या

देवा शी,

हसत होता बघत होता खेळत होता जीवाशी…😌
प्रयत्न माझे संपले सारे पाण्यातच मी रडलो,

श्वास कोंडला जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो…😞
कोणाचं मी काय बिघडवलं असा कसा मी मेलो,

माफ कर मला प्रिये तुला मी अर्ध्यात सोडून गेलो…😭
आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून,

किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून…😭
बाबा म्हणजे सावली घराची जसा बहरदार झाड,

ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड…😭
बायको ने हि रडून रडून अर्धा जीव केला असेल,

पोरं माझी कशी झोपतील जेंव्हा पप्पा नसेल ???😭
मित्रांच्या हि पार्ट्या आता जरा थांबल्या असतील,

आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील…😔
संपली सगळी नाती क्षणार्धात संपली स्वप्न सारी,

इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या संपली दुनियादारी…😭
रडू नको ना आई, का गं अशी तू करती,

तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती…😭
बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आला,

शोधायला तुझ्या लेकराला मुख्यमंत्री हजर झाला…😭
आमदार हि धावून आले पोलिसांची घाई,

आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई…😔
लवकर शोधा “योगेश”ला आठवण घरची येते,

कधी भेटते आई मला अनं कधी छाती शी घेते…😭

कधी छाती शी घेते…😭

कधी छाती शी घेते….

Advertisements

Author:

I am determined to be cheerful and happy in whatever situation I may find myself. For I have learned that the greater part of our misery or unhappiness is determined not by our circumstance but by our disposition. Facebook Profile: https://www.facebook.com/y.gavhale1 Email : y.gavhale@gmail.com

8 thoughts on “इच्छा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s