Posted in गोष्ट, धना

”धना” भाग ४ था

”धना”

भाग ४ था

तब्बल तासभर चाललेले थरारनाट्य नरभक्षक वाघाच्या अंताने संपुष्टात आले होते..!
सारा गाव हे भयानक दृश्य पाहत होता. धनाला या जीवघेण्या लढतीमुळे अंगावर झालेल्या जखमांचे भान नव्हते. रक्तबंबाळ अवस्थेत तो वाघाच्या बाजूला उभा राहिला, पण आता कुठे शरीराची जाणीव होऊ लागली.
पाय कंप पाऊ लागले, चक्कर आली आणि धनाचा तोल जाऊ लागला.
हे पाहताच तालमीतील सवंगडी त्याला सावरायला धावली.

धनाला उचलून गावात आणण्यात आले. गावाच्या वैद्यांनी जखमा पाहिल्या, वाघाच्या नख्यांनी खोलवर वर्मी घाव घातले होते आणि असे एक ना दोन.. अनेक घाव.. रक्ताचा कारंज्या थांबत नव्हत्या…!
वैद्याने पाटलांना सांगितले.. पाटील बैलगाडी जुंपा.. धनाला लवकर जिल्ह्याच्या इस्पितळात न्यायला पाहिजे नाहीतर काही खरं नाही..!
उपस्थित गावकरी हलून काम करू लागले, निरोप मिळताच केवळ १५ मिनिटात ३ बैलगाड्या जुंपून हजर झाल्या आणि बैलगाड्या जिल्ह्याचा प्रवास करू लागल्या …..!
इकडे गावाच्या पोलीस पाटलानी वनखात्याला वाघाचा अंत झाल्याची खबर दिली, असेही वनखाते उद्या येणार होतेच …!
धना बेशुध्द होता, त्याला जाणीव नव्हती.
गावकरी आणि तालमीतील मित्रासह वस्ताद, आई सोबत जिल्ह्याचे इस्पितळ गाठले.. पहाटे ३ वाजायला आले होते..!
गडबडीने डॉक्टर आले आणि पोलीस फिर्याद देऊन धनावर उपचार सुरु केले होते ..!
धनाच्या जखमा पाहून सर्वच थक्क झाले आणि या जखमा वाघाच्या आहेत हे ऐकून तर आश्चर्याचा धका बसला होता..!
सकाळ झाली.. तलावाच्या बाजूला तो नरभक्षक वाघ निपचिप पडला होता… ३-४ माणसे राखण द्यायला होतीच..!
कालच्या प्रकरणामुळे अख्ख्या गावाला झोप नव्हती..!
प्रत्येकाच्या मनात धना होता.
धनाने गावकर्यांचे मन जिंकले होते.ज्या वाघाने गेली ६ महिने नाकात दम आणला होता, अन्न गोड लागून दिले नव्हते अश्या महाभयन्कार वाघाला केवळ हाताने ठार मारणारा धना आता गावाचा ”हिरो” ठरला होता…!
प्राथमिक तपासणी आणि उपचार करत डॉक्टर बाहेर आले आणि पाटील व जबाबदार लोकाना बोलावून घेतले आणि सांगू लागले..!!
या जखमा खोलवर आहे.साधा चाकू पोटात गेला तरी जीव जातो माणसाचा आणि हे तर २५/३० चाकू एकाच वेळी लागले आहेत.
नशिबाने पोटावर जखम नाही, पण पाठ आणि मांड्यावर जखमा खोल आहेत.
जीवाला काही धोका नाही पण पेशंट बरा व्हायला ३ महिने पाहिजेत…!
१५ दिवसात तुम्ही घरी न्या पण जखमा बर्या व्हायला ३ महिने हवेत..!
पाटलांच्या चेहर्यावर आनंदाची लकेर उठली…!
धनाबद्ध्ल जो द्वेष होता तो रात्रीच निवळून गेला होता.. जो केवळ हाताने वाघ मारतो तो आपल्या मुलीचे संरक्षण कसाही करेल.. असा जावई मिळायला भाग्य हवे हे दुसर्या कोणी सांगायला नको होते …!
धनाने गावकर्यांच्या, पाटलांच्या आणि आईच्या मनात सुध्दा स्थान निर्माण केले.
आता कोणाचा राग नव्हता… फक्त एकच प्रश्न उरला होता… कि अजून ४ महिन्यांनी पंजाबी पैलवान बिल्ला यासोबत कुस्ती ठरली आहे.
गावाची इज्जत पणाला लागली आहे.. वस्ताद चिंता करू लागले..!
इकडे वनखाते गावात आले..!
एक तरुण उमदे वन अधिकारी पंचनामा करायला गावात आले होते..!
सूर्याजी जाधव त्यांचे नाव. मुळचे सातारचे सूर्याजीराव सुध्दा पैलवान होते.
कुस्तीनेच त्यांना वन खात्याची नोकरी दिली होती.
धनाच्या गावात वाघ सुटला आहे हि खबर ३ दिवसापूर्वी मिळाली पण गाव डोंगर दर्यात असल्याने सर्व साहित्य घेऊन येणे जिकीरीचे होते…!
३ दिवसाने येतो असे सांगितले आणि ते ठरल्याप्रमाणे आले..!
गावात मोटार गाड्यांचे आवाज आले. खाकी वेशात ४० भर वनखात्याचे जवान हत्यारबंद होऊन आले होते.
दुसर्या गाडीत पिंजरा आदी साहित्य होते..!
सूर्याजीराव थेट पाटलांच्या वाड्यात गेले ..!
वाड्यात एव्हाना कोणीही आले नव्हते. नोकरचाकर आणि राजलक्ष्मी आणि तिच्या मैत्रिणी होत्या …!!
सुर्याजीरावानी गाडीतून खाली पाउल टाकले आणि सैनिकी पावले टाकत वाड्याकडे गेले.. सोबत जवान होतेच ..!
जवानांनी हाक मारली… पाटील आहेत का ?
एक नोकर पळत बाहेर आला आणि घरात कोणी नाहीत.. केवळ ताईसाहेब आहेत असे बोलले ..!
रात्री नरभक्षक वाघाने केलेला हमला आणि धना ने केलेला पराक्रम त्यांच्या कानावर घातला..!
सूर्याजी आश्चर्य व्यक्त करू लागला. केवळ हाताने वाघ मारला ?
मला भाकडगोष्टी नका सांगू… कुठलाही माणूस वाघाशी हाताने लढू शकत नाही,.. आणि हा धना तरी कोण ?
इतक्यात वरच्या मजल्यावर असलेल्या राजलक्ष्मी ला हे ऐकू गेले.
तीला ते सहन झाले नाही. ती चवताळून खाली आली आणि सूर्याजीला म्हणाली ….!
वाघाला ज्याने मारला तो पण वाघच होता… माझा वाघच होता.. लाज सोडून ती बोलून गेली आणि धनाच्या काळजीने तिला रडू अनावर झाले.. तसेही रात्रभर ती रडतच होती….!
सूर्याजी ने राजलक्ष्मी चे रूप पाहिले आणि थक्क झाला..!
सूर्याजी सुध्दा गावाचा पैलवान होता ,३ वर्षे झाली होती नोकरीला..!
राजलक्ष्मी चे ते सौदर्य कितीतरी वेळ पाहत तो काहीच न बोलता ऐकत होता.!
सोबत असलेल्या जवानांनी त्याला सावध केले… आणि तो चटकन जिथे वाघ मरून पडला होता तिथे पंचनामा करायला जाऊ लागला, जाताना कितीतरी वेळ वाड्याकडे वळून पाहू लागला ..!
त्याला वाटले धना हा याच घरचा कोणीतरी असावा…पण बाकीचे प्रश्न कोणाला विचारावे असे म्हणत तो गप्प बसून राहिला…!
वाघाच्या ठिकाणी सारे जवान आले.
वन खात्याच्या डॉक्टरानी पंचनामा सुरु केला.!
तळ्याच्या बाजूला कॅम्प लागला.
पुढे शेकोटी पेटवली, जवान हत्यारे ठेवत आपापल्या कामाला लागले..!
डॉक्टर आणि सूर्याजी खूप वेळ चर्चा करत होते..!
वाघ खरच नरभक्षक होता का ?
होय होता.. माणसाच्या माणसाचे अंश त्याच्या पोटात सापडले होते.
पण एखाद्या माणसाने वाघाला केवळ हाताने मारावे हा प्रकार डॉक्टर आणि सूर्याजी दोघानाही अचंबित करणारा विषय होता..!
धना बध्दल दोघानाही कुतूहल दाटून आले होते..!
१५ दिवसांचा अवधी घेऊन सारे जवान आणि सूर्याजी खास वाघासाठी आला होता.. पण आता वाघ तर मेला होता ..!
वर उत्तर काय द्यायचे ?
जर माणसाने वाघाला मारला हे सांगितले तर कोणाला पटायचे नाही आणि जरी पटले तरी धना हा वनखात्याचा गुन्हेगार होणार ..!
सुर्याजीच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले.!
पण गावाचे पाटील जोवर गावात येत नाहीत तोवर काही अंतिम निर्णय घेऊ शकत नव्हते …!
इकडे डॉक्टर पोलीस कारवाई पूर्ण करत धनावर उपचार सुरु केले होते.
”वाघाचा हमला” इतकेच कारण लावले होते..!
इस्पितळात धनाची आई, गावातील २०-२५ मंडळी थांबली आणि पाटील आणि वस्ताद गावाकडे जायला निघाले …!!
क्रमश
५भाग उदया!

Advertisements

Author:

I am determined to be cheerful and happy in whatever situation I may find myself. For I have learned that the greater part of our misery or unhappiness is determined not by our circumstance but by our disposition. Facebook Profile: https://www.facebook.com/y.gavhale1 Email : y.gavhale@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s