Posted in गोष्ट, धना

”धना”भाग ९ वा

”धना”

भाग ९ वा

सेनापती धनाला विश्रांती करायला सांगून तडक महाराज यशवंतराव यांच्या भेटीला निघून गेले..!
किल्ल्याच्या एका दालनात महाराज साहेबांचे निवासस्थान होते
महाराज यशवंतराव हे अतिशय त्यागी,संयमी आणि अनुभवी राजे होते.

धनाच्या वडिलांनी त्याना पुण्याच्या एका कुस्ती मैदानात त्याना हेरले होते.
वस्तादानी देशसेवेचे हे व्रत त्याना समजावून सांगितले आणि राजे तेव्हापासून वस्तादांच्या फौजेत सामील झाले.
इंग्रजी ठाणी लुटणे,देशांतर्गत शत्रूना यमलोकी पाठवणे आणि समाजातील वाईट व अनिष्ट गोष्टीविरुध्द लढणे हे मुख्य काम त्याकाळी फौज करत असे.
पण देश स्वतंत्र झाला.
ज्या उद्दिष्टाने फौजेची बांधणी केली ते उद्दिष्ट पूर्ण झाले होते.
सर्वजन आनंदात होते…!
पण देशात अजूनही खूप ठिकाणी अन्याय अत्याचार चालू होते.
कित्येक ठिकाणाचे भांडवलदार त्या त्या गावाचे ,राज्याचे अनिभिषिक्त राजे स्वताला समजत होते.
देशातून ब्रिटीश गेले मात्र या मदमस्त भांडवलदारांच्या पायाखाली जनता पायदळी तुडवली जाऊ लागली..!
त्यामुळे हा लढा पुन्हा सक्रीय करण्याचा निर्णय यशवंत महाराजांनी केला.
जोवर या देशातील जनता स्वाभिमान,पुरुषार्थ,पराक्रमी आणि मन मेंदू आणि मनगट मजबूत करून आपल्या कुटुंबच्या कल्याणाबरोबर देशाचे कल्याण करायची उर्मी मनात ठेवत नाही तोवर संघटन आणखी मजबूत करायचे असा विचार करत यशवंत महाराज पुन्हा कामाला लागले..!
हे सर्व करता करता त्यानी वयाची सीमा कधी ओलांडली कधी समजेल नाही.
पण धनाची कुस्ती,वाघासोबत केलेला पराक्रम हे पाहताच यशवंतराव महाराजाना या महान कार्याचा वारस मिळाला होता.
पण प्रश्न होता कि धना ला हे कितपत पटेल ?
शिवाय त्याचे पाटलाच्या पोरीबरोबर प्रेमप्रकरण सार्या गावात झाले होतेच..!
पाटिल आधीच महाराजांच्या गुन्हेगारांच्या यादीत होता.
धना आणि यशवंतराव महाराज यांच्या भेटीचा दिवस ठरला..!
धनाने यशवंतराव महाराजांच्या कडे पाहिले..!
महाराज साधारण ७० च्या वर वय असलेले मात्र अंगापिंडाने मजबूत होते.
करारी नजरच माणूस काय ताक्तीचा असेल ते सांगत होती..!
धनाने महाराजाना मुजरा घातला..!
महाराज बोलू लागले …!
” धना,जन्मल्यापासून तुझ्यावर आमची माणसे नजर ठेवून आहेत.
तू अगदी बापाच्या वळणाचा आहेस.
काही फरक नाही तुझ्यात आणि वस्तादांच्यात ,म्हणूनच कि काय त्यांनी जी चूक केली ती तुही केलीस..!
तुझ्या वडिलाने महान उद्देश ठेवत हे संघटन उभे केले.
दगडात हिरे शोधले ,या महान कार्यात आणले..पण ते ही महाचूक करून बसले.
होय चूक म्हणजे चूकच …ज्यांच्या जन्मच मुळी महान कार्यासाठी झाला अशांनी प्रेमासारख्या गोष्टीसाठी हतबल व्हावे ?
प्रेम करणे गुन्हा नाही ,पण दुनियेतील करोडो लोकांपैकी एखादाच केवळ देशाच्या कामासाठी जन्माला येतो…त्याने असे विषय सुखाला बळी पडू नये.
तुझ्या वडिलांची इच्छा होती कि तू या संघटनेचे नेतृत्व करावेस..!
आम्ही हजार वीर तुझ्या शब्दासाठी मरायला आणि मारायला तयार आहोत…तुला भावी राजा म्हणून आम्ही पाहतोय ..!
सांग,तुझी काय इच्छा आहे ?
तुझ्या वडिलांचे कार्य तुला पूर्ण करायचे आहे ?
जर हो असेल तर आमच्या तलवारी तुझ्यासाठी लढतील आणि नसेल तर तुला परत गाडग्या मडक्याच्या संसारासाठी तुझ्या गावी पोहचवू ..!
तुझा होकार तुझ्या मागील आयुष्याच्या पूर्णविराम असेल.
या समाजात कोणालाच माहिती नाही कि आम्ही सारे इतक्या गुप्तपणे देशाचे काम करतोय ..!
तुही कुठे बोलू नकोस ..!
तुझी इच्छा सांग ?
मोठ्या यक्षप्रश्नात धना पडला होता..!
ज्या प्रेमामुळे वाघाला मारायची ताकत मिळाली ते प्रेम कसे विसरायचे ?
आणि न विसरावे तर वडिलांच्या सर्व आशा ज्या माझ्या रूपाने पूर्ण व्हाव्यात असे त्याना वाटत होते त्या अपूर्ण राहतील..!
जो वडिलांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करत नाही तो कसला मुलगा ?
धनाने मनावर आवर घातला आणि राजाना सांगितले मी या महान कार्यात स्वताला झोकून द्यायला तयार आहे ..!
सार्वजन जणू याच उत्तराची वाट पाहत होते.
सर्व फौजेतील सेनेने एकच जल्लोष केला,घोषणा दिल्या..!
धना उद्यापासून तुला सैनिकी शिक्षण सुरु होईल..!
तुझ्या जखमा बर्या होईपर्यंत तुला तोंडी कामे समजून सांगण्याची जबाबदारी सेनापती तुमची..!
सेनापातीनी होकारार्थी मान हलवली आणि दोघेही त्यांच्या निवासस्थाने निघून गेले..!

इकडे गावात सूर्याजीने हळू हळू व्यायाम सुरु केला.
दररोज पहाटे त्याला उठवायला वस्ताद स्वता येत.
५०/६० जन मिळून गावाच्या डोंगरावर पळायला जात.
येताना तलावात पोहत महादेवाच्या मंदिरातून पुन्हा तालीम.
तालमीत २-३ तास लढत ..लढतीनंतर थोडाफार व्यायाम आणि परत विश्रांती..!
सारे गाव सुर्याजीच्या या त्यागाच्या लवकरच प्रेमात पडले.
घराघरातून तूप ,दुध ,केळी येऊ लागले .
सूर्याजीचे शरीर चार एक दिवसातच बाळसे धरू लागले..!
दररोज २ लिटर थंडाई,व्यायाम,लढत,विश्रांती,मालिश आणि केवळ कुस्तीवरील चर्चा यामुळे सुर्याजीचे गेलेली चपळाई केवळ १५ दिवसात प्राप्त झाली..!
कोल्हापूरच्या भोसले ठेकेदारांनी सर्व महाराष्ट्रात या कुस्तीची जाहिरात करायला सुरवात केली.
सार्या जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवराना निमंत्रणे गेली ,कुस्तीची तिकिटे हातोहात आधीच खपू लागली..!
राजलक्ष्मी आवडीने सुर्याजीची राहणे,खाणे काय हवे नको याचे देखभाल करू लागली.
मात्र तिचे मन चातकासारखे धनाच्या आठवणीत होते..!
पोलिसांनी धनासाठी जंग जंग पछाडले पण काहीच मागोवा लागला नाही..!

इकडे धना बंदूक चालवू लागला,अचूक नेमबाजी शिकला.सर्व जखमा खपली धरू लागल्या.
घोड्यावर बसून घोडा भरदाव फेकू लागला ,नदीच्या उलट्या प्रवाहात पोहायला शिकणे ,तलवार भाला बरचा,कुर्हाड फिरवणे हे शिक्षण सुरु झाले.
शत्रूच्या राज्यात हेरगिरी करणे,आवाज बदलाने,वेषांतर करणे,या हेरांच्या गोष्टीही त्याने आत्मसात केल्या..!
धनाने तलवारीसारखी मिशी आणि दाढी राखायला सुरु केली..!
पूर्वीचा जाडजूड ढाण्या वाघ असलेला धना आता चपळ चित्ता झाला होता..!
सरसर झाडावर चढणे ,एकाच वेळी १० शत्रूशी चार हात करणे हे मल्लाविद्येतील पुढचे गूढ़ ज्ञान राजांनी त्याला दिले..!
संस्कृत आभ्यास,महाभारत,रामायण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवचरित्राचे वाचन दररोज करणे हा त्याचा नित्यकर्म भाग झाला..!
राजलक्ष्मी ची आठवण आली डोळ्यांच्या कडा ओल्या होत आणि आईच्या आठवणीने तर अश्रुंचा बंध फुटत असे …पण वडिलांच्या अपूर्ण स्वप्नासाठी आणि देशासाठी धनाला हे कडू जहर गिळायला लागणार होते…!
पण काही होऊदे ,राजलक्ष्मी ला एक नजर पाहूनच यायचे ,त्याला माहित होते दर सोमवारी राजलक्ष्मी तळ्याच्या महादेव मंदिराला येत असते.
त्याचे मन नको म्हणत असे,पण शेवटी त्याने मनाची समजूत घातलीच.
मनातील खल सेनापतींच्या कानी घातला.
केवळ धनाच्या मनासारखे व्हावे म्हणून सेनापतींनी गुप्तपने होकार दिला.
पण दिवस मावळायच्या आत किल्ल्यात परता असा सज्जड़ दमही दिला.
तुम्ही आता आमचे राजे होणार आहात.
धनाने ठरवले या सोमवारी ठराविक मंडळी सोबत घेऊन गावतळ्याजवळ उतरायचेच ….

हळूहळू मैदानाची तारीख जवळ येऊ लागली…!
पूर्वी पैलवानांच्या फोटोची आजसारखी व्यवस्था नसायची त्यामुळे चित्रकार अंदाजे फोटो हाताने काढून जाहिरात करत असे..!
बिल्ला पंजाबी पैलवान सोबत ४-५ पैलवान घेऊन पंजाब वरून निघाला आहे आणि येत्या 10/15 दिवसात कोल्हापुरात येऊन दाखल होईल अशी तार कोल्हापूर कलेक्टर कार्यालयात आली होती.

सूर्याजीला काही कमी नव्हते.दिवसभर तालमीत घाम गाळणे आणि राजलक्ष्मीच्या प्रेमळ हाताने पाहुणचार स्वीकारणे यात दिवस जाऊ लागले.
सूर्याजीला मनातील भावना तिला सांगू वाटत होत्या,पण ना जाणे त्याला अनामिक भीती वाटत होती.
एके दिवशी सोमवार होता,त्याने ठरवले कि आज महादेवाच्या मंदिरात राजलक्ष्मी सोबत आपण जायचे आणि भावना व्यक्त करायच्या ..!
त्याने सोमवारी लौकर उठून पाटलाना सांगावा दिला ,पाटील आज मी सुध्दा देवदर्शनाला जाणार आहे ,जायच्या वेळी मला हाक द्यायला सांगा..!
पाटलानी राजलक्ष्मी,सूर्याजी सोबत २ गडी देऊन मंदिराकडे जायची तरतूद केली..!

सूर्याजी हृदयात केवळ राजलक्ष्मी ला मनातील भावना सांगणे हेच ध्येय होते.राजलक्ष्मी पदर सावरत मंदिराकडे निघाली..!
मंदिर परिसरात सकाळची गर्दी विरळ असते.
मंदिराच्या पुजार्यांनी पूजेची व्यवस्था केली आणि राजलक्ष्मी पाणी आणण्यासाठी गेली…!
सूर्याजी पूजेला बसला होता ,सोबत अणेलेले गडी मंदिरातच थांबुन पुजेला मदत करु लागले.
पण,अगदी भल्या पहाटेच धना ठराविक हात्यारबंद अंग रक्षक सोबत घेऊन तळ्याशेजारच्या जंगलात दबा धरून बसली होता.
धना केवळ २ महिन्यात शस्त्रे,हेरगिरी,लढाई,सर्वकाही शिकला होता..!
धनाने हेरले कि राजलक्ष्मी नदीवर आली आहे..!
त्याने एका बाणाच्या टप्प्यावर सारे जासूद अंगरक्षकांना ठेवून स्वताच्या अंगाभोवती चादर लपेटली आणि धना मोठ्या धाडसाने राजलक्ष्मीला भेटायला  निघाला…!
धनाने मिश्या आणि दाढी वाढवली होती ,सहजासहजी राजलक्ष्मी काय किंवा कोणीही तिला ओळखू शकत नव्हते…!
धना झपाझप पावले टाकत आणि पाठीवर लपवलेली बंदुक पेलत सावधपणे राजलक्ष्मी कडे जाऊ लागला..!
राजलक्ष्मी पाणी भरून घागर कमरेला लावणार इतक्यात केवळ ६-७ फुटावर माणसाची सावली दिसली..!
तिने मागे वळून पाहिले आणि भीतीने घागर टाकली ….कोण तुम्ही ???
धनाने अंगावरील चादर बाजूला केली …….धनाच्या डोळ्यांनी राजलक्ष्मी च्या डोळ्यात पहिले राजलक्ष्मीने धनाच्या डोळ्यात पाहिले…बस्स दुरे काही सांगायची गरज पडलीच नाही …दोघांचाही भावनेचा बांध फुटला …..!

वर्षानुवर्षे पाउस न पडलेल्या तापलेल्या भूमीवर अचानक धुव्वाधार बेफान वादळी पाउस पडावा आणि हजारो नदीनाले बेधुंद होऊन वाहावे,पशुपक्षी ,प्राणी सारे आनंदाने त्यात नाचावे अगदी अशीच काहीशी अवस्था धना आणि राजलक्ष्मी दोघांचीही झाली होती…!
ते दोन देह एकमेकांच्या मिठीत विसावले …कितीतरी वेळ ती घट्ट मिठ्ठी आणखी घट्ट होत होती …जणू देह दोन मात्र जीव एक ……!!

खूप वेळ निशब्द मिलन,केवळ देहांच्या भेटी आणि अश्रुंचा पूर ….!
धनाने राजलक्ष्मीचे डोळे पुसले..आणि राज लक्ष्मीच्या हनुवटीला हाताने पकडत बोलला….आम्हाला विसरला तर नाहीत ना????
क्रमश
१० भाग उदया!

Advertisements

Author:

I am determined to be cheerful and happy in whatever situation I may find myself. For I have learned that the greater part of our misery or unhappiness is determined not by our circumstance but by our disposition. Facebook Profile: https://www.facebook.com/y.gavhale1 Email : y.gavhale@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s