”धना”
भाग २० वा (अंतिम)

धनाच्या हृदयाची कंपने अतितीव्र झाली होती,सावध होऊन बंदुकीत बार ठासायाला वेळच नव्हता,राजलक्ष्मी धनाच्या काळजीने अधीर झाली.
नशिबाने कित्येक दिवसांनी त्याची भेट घडवली होती,पण काही क्षणात आता धना कधीच दिसणार नाही अशी परिस्थिती आली होती.तिचे काळीज फाटू लागले.
३-४ वाघ गुरगुरत धनाच्या जवळ येऊ लागले.

Continue reading “”धना” भाग २० वा (अंतिम)”

Advertisements

”धना” भाग २० वा (अंतिम)

“धना”

भाग १९ वा

दुरवर दम खात असलेला धना आणि त्याच्या हातातील नुकतीच बार टाकलेली बंदूक धूर टाकत होती ..धनाला पाहून राजलक्ष्मीच्या मनात आनंदाचे काहूर निर्माण झाले …पण क्षणात तिच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला ….तिने डोळे वटारले ….भीतीने तिने आर्त किंकाळी टाकली आणि धनाकडे पाहू लागली…धनाला काही समजले नाही…तो मागे वळून पाहू लागला तर एकाच वेळी ५-६ भुकेले वाघ त्याच्या दिशेने येत होते. ……धनाच्या बंदुकीतील २ बार आधीच उडाले होते….आणि वाघ केवळ एका झेपेच्या अंतरावर आले होते ……!!

Continue reading ““धना” भाग १९ वा”

“धना” भाग १९ वा

”धना”

भाग १८ वा

जवळपास तासभर झाडाखालून सूर्याजीसह सैन्याचा ताफा किल्ल्याच्या रस्त्याला लागला होता..!
सैन्य निघून गेले आणि धना ने अंगावरी काळ्या वस्त्र आणि झाडाच्या आत घुसलेला बाण हाताने काढला,सेनापती आणि धना सरसर झाडाखाली उतरली.
समोरच्या झाडावरून तो बाण मारलेला मात्र काळ्या कपड्याने चेहरा झाकलेला योद्धा पण उतरून समोर चालू लागला ,तिघेही समोरासमोर येताच त्या योध्याने चेहऱ्यावरील काळे वस्त्र हटवले आणि पांढर्या केसांच्या बटा बाहेर दिसू लागल्या,कपाळावर शिवगंध चमकत होता ,आणि चेहरयावरील वर्धक्याच्या सुरकुत्या मात्र अनुभवांच्या अनुभूती दाखवत होत्या ….शेलार मामा ..!

Continue reading “”धना” भाग १८ वा”

”धना” भाग १८ वा

“धना”

भाग १७ वा

पाटलांच्या गावात सशस्त्र गावकर्यांनी एकच कल्लोळ केला होता,काहीही होवो पण पाटलांच्या मुलीला परत आणले पाहिजे.
तेवढ्यात गावातील एक गावकरी कोल्हापुरातून धापा टाकत आला …तो पोलीस मुख्यालयात कामाला होता आणि तो पाटलाना सांगू लागला…पाटील..आज सकाळपासून हजारो वनखात्याचे जवान एकत्र जमले होते,सशस्त्र जवानांची हजाराची तुकडी वनअधिकारी सुर्याजीरावांच्या आदेशाने कोणत्यातरी गुप्त मोहिमेवर जात आहे असे वाटते ,इतर बातम्या काही केल्या समजू शकल्या नाहीत.

Continue reading ““धना” भाग १७ वा”

“धना” भाग १७ वा

”धना”

भाग १६ वा…!

पाटलांच्या आणि गावकर्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता.
आपल्या गावात येऊन प्रत्यक्ष पाटलांची मुलगी पळवली जाते ,तर मग सर्वसामान्यांच्या आयाबाहीनीने कुणाकडे पहावे ?
सर्व गाव पाटलांच्या वाड्यासमोर गोळा झाला होता ,पाटील,वस्ताद आणि मातब्बर मंडळी घण चर्चेत व्यस्त होती.
हा प्रश्न आता केवळ पाटलांचा उरला नव्हता. Continue reading “”धना” भाग १६ वा”

”धना” भाग १६ वा

“धना”

भाग १५ वा

मध्यरात्र होत आली तरी धनाच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते.
प्रेम आणि कर्तव्य या दोहोंच्या कात्रीत त्याच्या मनाचा बळी जात होता.
अश्यावेळी हताश होवून रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता…!
पण केवळ रडत बसने हा काही धनाचा स्वभाव नव्हता. Continue reading ““धना” भाग १५ वा”

“धना” भाग १५ वा

“धना”

भाग १४ वा

मैदानात लोकांचे किंचाळणे,धावपळ याव्यतिरिक्त काहीच समजत नव्हते.
पोलीस खात्याने त्वरीत मैदानात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरु केला.
बिथरलेल्या हत्तीने किंचाळत धनाकडे धाव घेतली होती..! Continue reading ““धना” भाग १४ वा”

“धना” भाग १४ वा

”धना”

भाग १३ वा

एव्हाना दुपारी ४ वाजून गेले होते.
सूर्याजी आणि धना दोघेही कुस्तीच्या तयारीला लागले.
मैदानात प्रेक्षकांचा महापूर आला होता.सूर्याजीने कपडे काढले.लंगोट लावत हनुमंताचे स्मरण केले.पांढरीशुभ्र लंघ परिधान केली.गळ्यातील चांदीची पेटी असलेले ताईत काढून ठेवले.अंगावर पांढरे उपरणे घेतले आणि समवेत आलेल्या ३-४ मल्लांच्या समवेत सूर्याजी मैदानाच्या उजव्या अंगाने धावत मैदानात आला. Continue reading “”धना” भाग १३ वा”

”धना” भाग १३ वा

 “धना”
भाग १२ वा

धनाने बिल्लाच्या सर्व कागदपत्राची तपासणी करून ओळखपत्र पाहिले.
उर्वरीत ४ साथीदार आणि धना सकाळीच कोल्हापुरात पोहचली.
कुस्ती उद्या होणार होती.
धनाने दाढी ठेवली होती.कलेक्टर कचेरीत जावून धनाने आपण बिल्ला पंजाबी आहे असे सांगितले. Continue reading ““धना” भाग १२ वा”

“धना” भाग १२ वा

”धना”

भाग ११ वा

धना आणि त्याचे अंगरक्षक सह्याद्रीच्या काळजात असलेल्या प्राचीन किल्ल्यावरील साम्राज्यात पोहचले.
धना ने घडलेली हकीकत सेनापतींच्या कानी घातली…!
धना भरलेल्या नयनांनी आपल्या खोलीत खूप विचारमग्न झाला..!
देशासाठी प्राणप्रिय लोकांची ताटातूट त्याने सहन केली होती.
आणि त्याचा त्याला अभिमान पण होती.तो एका अश्या संघटनेचा राजा होणार होता ज्या संघटनेने कितीही देशाची कामे केली तरी बाहेरच्या समाजाला त्यांचा थांगपत्ता नव्हता. Continue reading “”धना” भाग ११ वा”

”धना” भाग ११ वा